चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू होणार

*कोकण Express*

*चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू होणार*

*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची चिपी येथे माहिती*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यासाठी या खात्याचे मंत्री यांना मी सतत भेटत आहे. माझा पाठपुरावा सुरूच आहे, हे विमानतळ ३१ जानेवारी पूर्वी येथील राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण होणार असल्याचा त्यांनी शब्द दिला आहे. मी या अगोदरच अलाईन्स एअर तर्फे हे विमानतळ “उडान” या योजनेमध्ये अंतर्भाव केल आहे. यादृष्टीने पर्यटनाचा एक विस्तृत आराखडा मी तयार केला असून तो अमलात आणून पर्यटन कस वाढेल की ज्यामुळे चिपी एअरपोर्ट ला याचा फायदा होईल आणि यामुळे पर्यटक येतील. पर्यटक व एअरपोर्ट अस जे नात आहे त्या नात्याला अनुसरून मी पुढील काळात काम करणार आहे. अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी चिपी येथे बोलताना दिली.

सुरेश प्रभू यांनी मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांच्यासमवेत आज येथील चिपी विमानतळला भेट देऊन आय आर बी अधिकारी अमर पाटील यांच्या कडून कामाचा आढावा घेतला. यावेळी सर्वप्रथम वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने त्यांचे पुष्कगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी सभापती निलेश सामंत, लुपिन फाउंडेशनचे अधिकारी योगेश प्रभू, म्हापण माजी सरपंच गुरुनाथ मडवळ, उपसरपंच कुशेवाडा निलेश सामंत, परुळेबाजार सरपंच श्वेता चव्हाण, मच्छिमार नेते दादा केळुसकर, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, माजी सरपंच प्रदीप प्रभू, प्रकाश राणे, बाळू प्रभू, गुरुप्रसाद चव्हाण, संजोग परब, रुपेश राणे, संजय परब, धनश्री चव्हाण, सुनील चव्हाण, गौरव आरोलकर, जयेश सामंत आदी उपस्थित होते.

चिपी येथील कामाचा आढावा घेतल्या नंतर बोलताना श्री. प्रभू म्हणाले की, विमानतळ पूर्णत्वला जावं म्हणून केंद्र व राज्य सरकार या दोघांच्याही परवानगीची गरज हसते. केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या सुदैवाने मी केंद्रीय मंत्री असताना मी दिल्या होत्या. कंपनीला काही अडचणी असतील तर राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्याशी बोलून याचे निवारण करण्यात येईल. तसेच यावेळी मालवण वरून येणाऱ्या लोकांना विमानतळावर येताना फिरून यावे लागते, यासाठी त्याबाजून अजून एक प्रवेशद्वार करण्यात यावे अशी सूचना करत याचा प्रस्ताव तयार करा तो मी मंजूर करून घेईन असेही श्री प्रभू यांनी सांगितले.
यानंतर सुरेश प्रभु वेंगुर्ला शहर येथे आले असता दाभोली नाका येथे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी त्यांचे स्वागत केले . तसेच पुढील दौरयामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेस भेटीचे निमंत्रण दिले.
यावेळी नगरसेवक प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, शितल आंगचेकर, पुनम जाधव , जेष्ठ नेते बाळा सावंत , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर इत्यादी उपस्थित होते. यानंतर त्यांनी आरवली येथे श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. तेथे विश्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री बाळा राय यांच्याहस्ते सुरेश प्रभू व सौ उमा प्रभू यांच्या शाल व पुष्पगुच्छ देईन सन्मान करण्यात आला. यावेळी मयूर आरोलकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!