*कोकण Express*
*संजय राऊत मर्द आणि हिम्मत बाज असतील तर औरंग्याची बाजू घेणाऱ्या मविआ च्या नेत्यांवर थुंकून दाखवावे*
*भाजपा नेते आमदार नितेश राणे यांचे खुले आव्हान
*राऊत यांच्यात पवार साहेब बोलले त्याचा जाब विचारण्याची हिम्मत आहे काय ? केला सवाल*
* मुंब्रा येथे ४०० हिंदूंचे धर्मांतर होणार होत त्यावर आणि नंदकिशोर चतुर्वेदी वर अग्रलेख लिहा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
औरंग्यावर कोणाच प्रेम आहे हे सांगण्याची आता गरज राहिली नाही.संजय राजाराम राऊत ला थुंकण्याची सवय आहे ना..? तुझ्यात हिम्मत असेल तर समाज वादी पक्षाचे आमदार अबू आझमी जे औरंग्या आपला नेता,राजा आहे म्हणतो त्याच्या वक्तव्यावर थुंकून दाखव.मुंब्रा येथील राष्ट्रवादीचा आमदार जो दोन महिन्या पूर्वीच दंगल होणार म्हणून जाहीर करत होता.त्याच्यावर थुंकून दाखव. किंवा कोल्हापुरात दंगल होणार असे जाहीर करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यावर थुंकून दाखव. किंवा तुझ्यात हिंमत असेल तर आणि तू स्वतः मर्द असशील तर आदरणीय शरद पवार साहेब छत्रपती संभाजी नगर बोलणार नाही औरंगाबादच बोलणार असे म्हणाले आहेत त्याचा जाब विचारून दाखव असे आव्हान भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांना दिले.
कणकवली ओम गणेश निवासस्थाने आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील नेत्यांप्रमाणे ठाकरे सेनेचे संजय राऊत समाचार घेतला. ते म्हणाले,भांडुप चा देवानंद संजय राजाराम राऊत छत्रपती संभाजी नगर मधून सकळी बोलताना होता. भाजपा वर टीका करत होता.त्याला मी सांगेन की काल आदरणीय पवार साहेबांचं वृत्त वाहिनीवरील स्टेटमेंट ऐकलं. ते म्हणाले होते की ,”मी छत्रपती संभाजी नगर म्हणणार नाही तर औरंगाबाद असेच म्हणणार” यावर संजय राऊत काहीच बोलले नाहीत. संजय राजाराम राऊत यांच्यात हिम्मत असेल तर पवार साहेब बोलले त्याचा जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी.कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर असे नाव ठेवण्याचा आग्रह धरला होता त्यानुसार आमच्या सरकारने ते नाव दिलेले आहे आणि त्यांचा अपमान होत असताना तुम्ही मर्द आहात याची प्रचिती द्या. जाब विचारा मग आम्ही तुला खरा मर्द आहेस असे समजू.असे आव्हान यावेळी संजय राउत यांना केले. पवार साहेबांना आव्हान देण्याची हिम्मत तुमच्यात आहे का ? मग तुझी लायकी, उंची महा विकास आघाडीत काय आहे हे समजेल.
मुंब्रा येथील राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दंगली होणार हे जाहीर केले होते. जातीय दंगली घडणार हे आव्हाडांना कस समजलं होते ? कोल्हापूर मधील काँग्रेस नेते कोल्हापूर मध्ये दंगल होणार म्हणून सांगतात आणि आठ दिवसात दंगल होते.
तुझे या महाविकास च्या सहकाऱ्यांना विचारा त्यांना दंगल होणार हे कसं समजलं ? की उद्धव ठाकरेंनी त्यांना ट्रेनिंग दिली काय ?याचा जाब संजय राऊत यांनी विचारावा म्हणजे त्यांना महाविका आघडीतील स्वतःची लायकी कळेल. आणि ढुंगणावर लाथ घालून महाविकास आघाडीतून हाकलून देतील. अशा शब्दात आमदार राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
मणिपूर मधील अग्रलेख कसले लिहिता हिम्मत आहे तर ४०० हिंदूचे मुंब्रा येथे धर्मांतर होत असताना पोलोसांनी रोखलं. याबाब अग्रलेख लिही.नंदकिशोर चतुर्वेदी चा अग्रलेख लिही. मग तुला महविकास आघाडीतून बाहेर काढतील.
नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहे ? उद्धव ठाकरेच्या खोके कंपनी सांभाळणारा मातोश्री 2 चा खरा मालक आहे.हा चतुर्वेदी ज्याच्या मालमत्तेवर आता धाड पडली आहे.तो फरार आहे की गायब केलाय याबाबत उद्या लेख लिहा.सरकार ला मी विनंती करेन या पूर्वी श्रीधर पाटणकर ला ऑस्ट्रेलियात लपवले होते. आता सुद्धा पाटणकर पळून किंवा दडवून ठेवले जाण्याची शक्यता आहे. लूक आऊट नोटीस काढावी.
आवाज कुणाचा हे ब्रॉडकास्ट आदित्य ठाकरे सुरु करणार मात्र त्यात संजय राउत ला कुठेच स्थान नाही.भावजी बांदेकर त्यात पुढे आले आहेत. आणि राऊत ना बाजूला करण्याचे काम आदित्य ने केले आहे. पहिली मुलाखत सुद्धा परब यांची आहे यावरून आदित्य आणि राऊत यांच्यात वाद आहे म्हणून आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे याच्या ढुंगणावर लात मारली आहे. हे पुन्हा एकदा समोर आले आहेत. भविष्यात पगार मिळाला नाही म्हणून ठाकरे गटाचे कामगार शिंदे गटात सामील झाले तस राऊत देखील सामील होईल.त्यामुळे आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुझी चिंता करा असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.