वैभव नाईकांमुळेच तुमच्या नेत्याला मागच्या दरवाजाने विधानपरिषद, राज्यसभेवर जावे लागले याचे भान ठेवा

वैभव नाईकांमुळेच तुमच्या नेत्याला मागच्या दरवाजाने विधानपरिषद, राज्यसभेवर जावे लागले याचे भान ठेवा

*कोकण Express*

*वैभव नाईकांमुळेच तुमच्या नेत्याला मागच्या दरवाजाने विधानपरिषद, राज्यसभेवर जावे लागले याचे भान ठेवा*

*शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा भाजपा नेत्यांना सल्ला*

*मालवण ः प्रतिनिधी*

आमदार वैभव नाईक हे लढवय्ये आमदार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना लढवय्ये आमदार म्हणून ओळखतो. त्यांची नाळ जनतेशी जोडली आहे. त्यामुळे आमदारकीसाठी त्यांना भाजपच्या कोणत्याही नेत्याची किंवा मंत्र्याच्या शिफारशीची गरज नाही. या उलट वैभव नाईक यांच्यामुळेच तुमचे नेते नारायण राणे यांना मागच्या दरवाजाने विधान परिषदेवर जावं लागलं. स्वतःचा पक्ष विसर्जित करून भाजपात जाऊन राज्यसभेवर जावं लागलं, हा तुम्ही भाजपच्या नेत्यांनी विसरू नये. येत्या काळात वैभव नाईक यांना तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्व शिवसैनिक आणि कुडाळ मालवणची जनता सज्ज झाली आहे. फक्त निवडणुका घेण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांनी दाखावावी, असं प्रत्युत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिले आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टिकेचा श्री. खोबरेकर यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले, वैभव नाईक यांचं जनतेशी नातं आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही नेत्याला आमदारांची शिफारस करण्याची गरज नाही. तुमच्या विधान परिषदेच्या भिकेची आम्हाला गरज नाही. तुम्ही कोणताही उमेदवार फिक्स करा. तो तुमचा अधिकार आहे. त्याच्या पराभवाची हॅट्रिक करण्यासाठी आमदार सज्ज आहेत. आमदार वैभव नाईक यांची निष्ठा मातोश्री आणी उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. त्यामुळे तुमच्या नेत्यांशी किंवा मंत्र्यांशी तडजोड करण्याची आम्हाला गरज नाही, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!