*कोकण Express*
*कासार्डे हायस्कूलच्या कु.वैदेही राणे व वेदीका तेलीचे ‘राष्ट्रीय एन.एम.एम.एस.’ परीक्षेत सुयश*
*कासार्डे ; संजय भोसले*
सन.2022-23 या शैक्षणिक वर्षात इ.८वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एन. एम.एम.एस.परीक्षा शिष्यवृत्तीसाठी कु.वैदेही मधुसूदन राणे व कु.वेदिका दीपक तेली या ‘कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेची उज्वल परंपरा कायम विद्यार्थ्यिनी राखली आहे.
‘या यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयच्या’एन.एम. एम.एस.शिष्यवृत्ती विभागप्रमुख श्रीम. मिठबावकर डी.डी.,भोसले एस.डी.,खटावकर आर.एस.व श्रीम.सुतार पी. वाय. या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत विद्यार्थिनींचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर,माजी कार्याध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी प्रभाकर कुडतडकर,प्राचार्य एम.डी.खाडये,पर्यवेक्षक कुचेकर एन.सी.तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.