*कोकण Express*
*कणकवलीत माजी आ. परशुराम उपरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंतच्या राजकीय जीवनात कार्यकत्यांचे आम्हा प्रेम माझ्या पाठीशी राहिलेला आहे माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळपासूनच कार्यकर्ते आणि माझ्या मित्र परिवाराकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यामुळेच सामाजिक प्रश्न हाताळण्याची ऊर्जा मिळते ही प्रेरणा घेऊन पुढील वर्षभर मी जनतेसाठी प्रामाणिक काम करत राहत असल्याचे प्रतिपादन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यानी केले.
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे केक कापण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बांधकाम व्यावसायिक रामदास विखाळे, दया मेस्त्री, चार्टर्ड अकाऊट अमोल खानोलकर, राजू राणे, संतोष सावंत, वैभव काणेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मनसे कार्यकर्ते या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

