*कोकण Express*
*रवळनाथ मित्रमंडळाकडून कुणाल बागवे यांच्या स्मृती जपण्याचे काम – संदेश पारकर*
*कुणाल चषक प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कुणाल बागवे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. रवळनाथ मित्रमंडळ हे कुणाल चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून त्याचा स्मृती जपण्याचे काम करीत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. कुणाल बागवे हा चांगला खेळाडू होता. पण त्याचा अकाली जाणे सर्वांनाच्या मनाला चटका लावून गेला. रवळनाथ मित्रमंडळच्या क्रिकेट स्पर्धेत खेळणारे खेळाडू भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील, असा आशावाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सावंतवाडी मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
रवळनाथ मित्रमंडळातर्फे स्वयंभू मंदिरनजीकच्या असलेल्या मैदानावर कुणाल चषक प्रीमियर 2023 क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. पारकर बोलत होते. या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाप्रमुख सतीश सावंत व संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव,रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, समन्वयक तेजस राणे,वैभव मालंडकर,सहदेव बागवे,पुंडलिक राणे,देवू बागवे,रवी राणे,महेश राणे, परेश बागवे, जितेंद्र राणे, सचिन आचरेकर, दिव्या साळगावकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीने चाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सुशांत नाईक म्हणाले, कुणाल बागवे हा चांगला खेळाडू होता. त्याच्यातील खिलाडूवृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी होती. त्याच्या अकाली जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ रवळनाथ मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धा भरवून त्याची स्मृती जपण्याचे काम करीत आहे. मंडळाच्या कोणत्याही उपक्रमाला आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नीलम सावंत-पालव यांनी रवळनाथ मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देत मंडळाने सामाजिक उपक्रम हाती घ्यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन सागर कदम यांनी केले.
पहिला सामना स्टार बॉईज हळवल विरुद्ध स्वयंभू मित्रमंडळ कणकवली यांच्यात खेळवण्यात आला. तीन दिवस चालणार्या या स्पर्धेत आठ संघानी सहभाग घेतला असून यामध्ये जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू प्रत्येक संघात पहावयास मिळणार आहे. या स्पर्धेत पंच म्हणून मिथून चव्हाण, मेघन सरंगले, विवेक परब, प्रसाद चाळके पाहणार असून गुण लेखक म्हणून सोनू निग्रे, निखिल साटम पाहत आहेत.
या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी सायंकाळी खेळवण्यात येणार आहे. तरी याचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा रसिक प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन रवळनाथ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुरुदास करंबेकर, अमित बागवे, अनंत राणे, रजत राणे चेतन पेडणेकर, साईराज बागवे, श्रीकांत दळवी, मनोज पाटील, मिथुन चव्हाण, चेतन पवार आदी मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

