हेल्प अकॅडमी फोंडाघाट आयोजित भव्य खुल्या आंतरराज्य नाईट पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा

हेल्प अकॅडमी फोंडाघाट आयोजित भव्य खुल्या आंतरराज्य नाईट पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा

*कोकण Express*

*हेल्प अकॅडमी फोंडाघाट आयोजित भव्य खुल्या आंतरराज्य नाईट पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा*

*फोंडाघाट ःःप्रतिनिधी* 

सामाजिक,सांस्कृतिक, क्रीडा तथा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नेहमीच लोकांच्या मदतीला धावणारी हेल्प अकॅडमी फोंडाघाट यांच्यावतीने बुधवार दिनांक १९एप्रिल २०२३ रोजी भव्य खुल्या आंतरराज्य नाईट पासिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन कल्याणकर कंपाऊंड बाजारपेठ फोंडाघाट येथे करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५,००० रुपये व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक १०,००० रुपये व आकर्षक चषक असे असून वैयक्तिक मध्ये उत्कृष्ट स्मॅशर,उत्कृष्ट लिफ्टर, उत्कृष्ट लिब्रो व अष्टपैलू खेळाडू यासाठी आकर्षक चषक असणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या १२ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे तरी इच्छुक संघांनी आपली नावे गुरुवार दिनांक १३- ४-२०२३ पर्यंत खालील क्रमांकावर संपर्क साधून कळवावीत
विनोद भोगले ९९५७८९५०९९
प्रवीण पडेलकर ९४२०२५८४२१
यश कुबडे ७४९८३१२०५९
हेमराज तिरोडकर ७२१८४१२४७७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!