नदीपात्रा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या जितेंद्र तारी यांच्या कुटुंबाल मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत

नदीपात्रा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या जितेंद्र तारी यांच्या कुटुंबाल मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत

*कोकण Express*

*नदीपात्रा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या जितेंद्र तारी यांच्या कुटुंबाल मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

ओटवणे येथील नदीपात्रा बुडून दुर्देवी मृत्यू झालेल्या जितेंद्र उत्तम तारी यांच्या कुटुंबाला शिक्षण मंत्री तथ आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, शिवसेना

विभागप्रमुख तथा माजी सरपंच उमेश गांवकर, बापू कोठावळे, एकनाथ हळदणकर, शाखाप्रमुख मंगेश चिले, मंगेश गावंकर,

राजन तारी, मधुकर गांवकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ओटवणे येथील गरीब कुटुंबातील तरुण जितेंद्र तारी हा युक्त दाभीळ नदीवर मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा बुडुन मृत्यु झाला होता. तो एकुलता एक कर्ता मुलगा होता. आई वडील वृद्ध असून मुलांच्या मिळकतीवरच त्यांची उपजिविका चालू होती. अचानक प्रसंग घडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांना कोणतेच आर्थिक उत्पन्न नाही. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच केसरकर यांनी तातडीने आपल्या माध्यमातून “त्या” कुटुंबाला मदत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!