पोलीस सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन

पोलीस सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन

*कोकण Express*

*पोलीस सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन*

*कासार्डे ; संजय भोसले*

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सिंधुदुर्ग ओरोस येथील *गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोस* , यांच्या वतीने *पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर *14 व 15 एप्रिल 2023 रोजी निवासी* स्वरूपात असणार आहे.

बारावी परीक्षा उत्तीर्ण व बारावी परीक्षेला बसलेल्या तसेच पोलीस सैन्यदलात सहभागी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस सैन्य या प्रशासकीय सेवेत दाखल व्हावेत यासाठी या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये अकॅडमीचे नामवंत व अनुभवी प्राध्यापक , क्रीडा कोच ,पोलीस अधिकारी, यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.नाव नोंदणीकरिता दि.१० एप्रिल २०२३ पर्यत *9075385256/9923833793 /7264920062* यावर संपर्क करावा असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!