तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी नीता सावंत (कविटकर) यांची निवड

तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी नीता सावंत (कविटकर) यांची निवड

*कोकण Express*

*तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी नीता सावंत (कविटकर) यांची निवड*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड नीता सावंत कविटकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अँड वीरेश राऊळ व अँड प्रिया भावे-गावकर यांची निवड करण्यात आली आहे.

या नवीन तालुका समितीचे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष परिमल नाईक व माजी अध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणीत सचिव अँड राजेश पराडकर, खजिनदार अँड स्वप्निल कोलगावकर, सहसचिव अँड संतोष गावडे आदींचा समावेश आहे. तर सदस्य म्हणून अँड अभिषेक चव्हाण, अँड सायली दुभाषी आणि अँड सुप्रीम परब यांना संधी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!