*कोकण Express*
*ओरोस सिंधुदुर्गनगरी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथचा उद्या वार्षिक जत्रौत्सव*
*कोरोना मुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने जत्रोत्सव साजरा करणार – देवस्थान उपसमितीचा निर्णय*
*ओरोस ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गजिल्ह्यातील नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या ओरोस सिंधुदुर्गनगरी गावचे ग्रामदैवता श्री देव रवळनाथ मंदीरात उद्या रविवार ३ जानेवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना मुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी श्रींची विधिवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, दिवसभर श्रींचे दर्शन, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री ११ वा. पालखी मिरवणुक व नंतर १२ वा. वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यावेळी भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन ओरोस रवळनाथ देवस्थान उपसमिती व ओरोस ग्रामस्थांनी केले आहे.