आमदार शेखर निकम यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे केले आयोजन

आमदार शेखर निकम यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे केले आयोजन

*कोकण Express*

*आमदार शेखर निकम यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे केले आयोजन*

*कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील राजकीय,टी.व्ही.कलाकाराची उपस्थिती*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

चिपळुण- संगमेश्वर मतदार संघाचे लाडके आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गेले तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यंग बाॅईज क्लब सावर्डे च्या वतीने प्रकाश झोतातील पाच षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मोठ्या प्रमाणात संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
आज सकाळ पासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सह्याद्री परिवार अभीष्टचिंतन सोहळा,पुरस्कार वितरण सोहळा,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा भिले ब्राम्हणवाडी संगणक संच देण्यात आला.गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य, मान्यवराचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग या संघटनेचा नूकताच जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेले न्यू इंग्लिश स्कूल सावर्डेचे माजी विद्यार्थी संजय भाईप यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
माजी सभापती सौ.पूजा निकम यांच्या पंचायत समितीच्या निधीतून साहीत्य वाटप करण्यात आले.बहुउद्देशीय सभाग्रुहाचे उदघाटन करण्यात आले,रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रात्रौ युवा किर्तनकार ह.भ.प.भारतीताई अडसुळे बार्शी यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!