*कोकण Express*
*वाहतूक नियंत्रक चंद्रमणी कदम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार….!*
*एस.टी.आगार व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी दिल्या सदिच्छा..!!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्य परिवहन महामंडळ कणकवली आगाराचे वाहतूक नियंत्रक चंद्रमणी विश्वास कदम यांचा रा.प.कणकवली आगाराच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.आगार व्यवस्थापक पी.ए. यादव यांच्या हस्ते श्री.कदम यांना शाल,सन्माचिन्ह व भेटवस्तू देण्यात आली.
कणकवली आगार व्यवस्थापक दालनात झालेल्या यासेवा निवृत्तीपर सत्कार कार्यक्रमावेळी व्यासपीठावर लेखाकार रवींद्र भिसे, वाहतूक नियंत्रक विनय राणे,लिपिका सौ.आपटे,पत्नी चेतना कदम,मुलगी चैत्राली कदम,मुलगा मंदार कदम,तेजस कदम,तसेच कणकवली आगाराचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक पी.ए. यादव म्हणाले, कलमठ गावचे रहिवासीश्री.कदम यांनी गेली ३७ वर्षे एस .टी प्रशासना मध्ये सेवा बजावली. यामध्ये अनेक मित्र,प्रवासी जोडले.साधा,सरळ,शांत स्वभावाचे श्री. कदम सन १९९४ मध्ये त्यांनी वाहतूक नियंत्रकाची सूत्रे हाती घेतली.वाहतूक नियंत्रक पदाची धुरा प्रामाणिक व पारदर्शकपणे सांभाळत होते. त्या पूर्वी वाहक म्हणून ही काळ काम केले. कॉलेज वयीन विध्यार्थ्यांशी त्यांचे पालकत्वाचे नाते होते.असे सांगत शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री.कदम म्हणाले, आज ५८ व्यावर्षी मी सेवानिवृत्त होत यांच्यावर विश्वास बसत नाही.कणकवली आगरात गेले ३७ वर्षे काम करताना अनेक प्रसंग आले.मात्र त्यावरही मात करत आजपर्यंत प्रामाणिक काम करण्याची संधी मिळाली.सेवा देत असताना अनेक चांगली माणसे भेटली.एस.टी.प्रशासनाची जोडलेली नाळ यापुढे हि राहील अशी ग्वाही दिली. यावेळी विविध एस.टी.संघटेनच्या तसेच कर्मचाऱ्यानी त्यांचा सत्कार करत भेटवस्तू देवून सत्कार केला.