गांधीनगर ग्रामपंचायत बिनविरोध,भिरवंडे आणि तोंडवली-बावशी मध्ये ११ जागांसाठी ४० उमेदवारी अर्ज

*कोकण Express*

*गांधीनगर ग्रामपंचायत बिनविरोध,भिरवंडे आणि तोंडवली-बावशी मध्ये ११ जागांसाठी ४० उमेदवारी अर्ज*

*तालुक्यात तीन ग्रापच्या २१ जागांमधून १० जागा बिनविरोध*

*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे.तर भिरवंडे ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर या ग्रामपंचाय मधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.तोंडवली- बावशी ग्रामपंचायत मध्ये सात जागांसाठी ३० अर्ज दाखल झाले आहे.तालुक्यातील ११ सदस्यपदासाठी ४० अर्ज दाखल झाले आहेत.

कणकवली तालुक्यात तीन ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत त्यातील गांधीनगर ग्रामपंचायत च्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले.त्यात प्रभाग १ मध्ये सौ.प्रसन्ना प्रशांत सावंत,तुषार भगवान सावंत,राजेंद्र रामचंद्र सावंत,प्रभाग २ मधून सौ.मंजुषा महादेव बोभाटे, सौ.विनिता दिनेश सावंत, आणि प्रभाग ३ मधून मंगेश अनंत बोभाटे,सौ.सुनीता अणजी सावंत या सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले यात विरोधात अर्ज नसल्याने ही ग्रामपंचाय पूर्णतः बिनविरोध झाली आहे.याठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून न्यानेश पाताडे, सहाय्यक तनोज कळसुलकर यांनी काम पाहिले.

तोंडवली -बावशी ग्रामपंचायत च्या सात जगणसाठी एकूण ३० अर्ज दाखल झाले आहेत.यात प्रभाग १ मधून दोन जागांसाठी ७, प्रभाग २ तीन जागांसाठी १४ तर प्रभाग ३ मधून दोन जागांसाठी ९ अर्ज दाखल झाले आहेत.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रमोद पालकर यांनी काम पाहिले. भिरवंडे ग्रामपंचायत च्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे.

त्यातील प्रभाग क्रमांक १ मधील मिलिंद रुकमाजी पवार आणि सुजाता संतोष सावंत या बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग २ मध्ये एका जागेसाठी दोन तर दुसऱ्या सर्वसाधारण जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग ३ मध्ये विष्णू धर्मजी डीचवलकर हे बिनविरोध झाले आहेत तर एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कैलास राऊत तर साहाय्यक संजय धुरी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!