निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आचरेत “शिवसेनेकडून” जल्लोष

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आचरेत “शिवसेनेकडून” जल्लोष

*कोकण Express*

*निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आचरेत “शिवसेनेकडून” जल्लोष*

*आचरा ःःप्रतिनिधी* 

मागील आठ महिन्यांच्या कायदेशीर लढाई नंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेला “शिवसेना” नावासह ” धनुष्यबाण” चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आचरा येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर एकमेकांना लाडू पेढे भरवून पदाधिकारी यांनी आनंद साजरा केला.

यावेळी तालुका प्रमुख महेश राणे, शिवसेना प्रमुख भास्कर राणे, शिवसेना मालवण कुडाळ निरीक्षक सुनिल पारकर, तसेच शिवसेना कार्यकर्ते मयू घाडी, अश्विन हळदणकर, अमर पलसंबकर , चंदू कदम, महेश मुळ्ये, पंकज धुरी, किशोर शिर्के, श्रीपाद सावंत, बाबू केरकर, रोहन धुरी, डुबा परब व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!