*कोकण Express*
*गाबित समाज वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पदी दिलीप गिरप तर सचिवपदी किरण कुबल यांची निवड..*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
गाबित समाज सिंधुदुर्ग संस्थेच्या वेंगुर्ला तालुका कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून वेंगुर्ला गानित समाज संस्थेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष श्री.दिलीप उर्फ राजन गिरप तर सचिव पदावर श्री.किरण कुबल यांची निवड करण्यात आली आहे.
गाबित समाज वेंगुर्ला तालुक्याची बैठक गाबित समाज सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांचे मार्गदर्शनाखाली मांडवी येथील नेचर होम स्टे येथे पार पडली.यावेळी श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, मुंबई आणि जिल्हा संघटनेच्या कामकाजाबाबत सर्वंकष माहिती दिली.तसेच वेंगुर्ला तालुक्यातील विशेषत: किनारपट्टी भागातील सर्व गावांतील गाबित समाज बांधवांना एकत्रित आणून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील गावांतील प्रमुख प्रतिनिधींची बैठक येत्या शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मांडवी नेचर होम स्टे येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
सदरील बैठकीमध्ये उपाध्यक्षपदी श्री.भगवान मसुरकर,सह सचिव म्हणून श्री.नागेश गांवकर,खजिनदार श्री. जयंत मोंडकर,महिला प्रतिनिधी सौ. श्वेता हुले,ईशा मोंडकर,सदस्य पदी श्री.बाबी रेडकर,अनंत केळुस्कर, सगुण सातोस्कर,विकास आरोंदेकर,यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय गाबित समाज संघटनेतर्फे येत्या एप्रिल महिन्यात गाबित समाजाचा भव्य महोत्सव दांडी मालवण येथे भरविण्यात येणार असल्याने या महोत्सवामध्ये वेंगुर्ले येथून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी येथे केले आहे.