राजकारण आणि समाजकारणातील दोन दिग्गज रविवारी एकाच व्यासपीठावर

राजकारण आणि समाजकारणातील दोन दिग्गज रविवारी एकाच व्यासपीठावर

*कोकण Express*

*राजकारण आणि समाजकारणातील दोन दिग्गज रविवारी एकाच व्यासपीठावर !*

*निमित्त रेडी येथील रेडकर हॉस्पिटल संचलित “विसावा”च्या शुभारंभाचे …*

*मालवण ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सिंधुदुर्गच्या सामाजिक पटलावरील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले युवा उद्योजक विशाल परब हे रविवारी २२ जानेवारीला एकाच व्यासपीठावर येत आहेत. रेडकर हॉस्पिटल संचलित “विसावा” या नवीन उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त हा योग जुळून आला आहे. रविवारी २२ जानेवारीला दुपारी ४ वाजता रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मानव साधन विकास संस्थेच्या चेअरमन सौ. उमा प्रभू, गोव्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. विवेक रेडकर व सुरेश झांटये यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेंटरच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सेंटरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!