कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यात मुख्याध्यापक संघ , शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांचा झंझावती दौरा

कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यात मुख्याध्यापक संघ , शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांचा झंझावती दौरा

*कोकण Express*

*कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यात मुख्याध्यापक संघ , शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांचा झंझावती दौरा*

कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारात वेंगुर्ले तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ , शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांनी आघाडी घेतली असून प्रत्येक हायस्कूल मध्ये जाऊन शिक्षक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या जात आहेत.
मुख्याध्यापक संघाचे सिंधुदुर्ग प्रभारी रमेश जाधव सर ( बदलापूर ) व गुलाब दवने सर ( बदलापूर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील आसोली हायस्कूल , सरस्वती विद्यालय आरवली – टाक , बावडेकर हायस्कूल शिरोडा व माऊली विद्यामंदिर रेडी या चार शाळांमध्ये जाऊन शिक्षक मतदारांना ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , मुख्याध्यापक संघाचे वेंगुर्ले अध्यक्ष प्रमोद कांबळे सर , शिक्षक परिषदेचे वेंगुर्ले अध्यक्ष कीशोर सोन्सुरकर सर , माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे सर , रेडी जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ , रेडी सरपंच रामसिंग राणे , शिरोडा मा.सरपंच मनोज उगवेकर , ता.सरचिटनिस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर , शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे व महादेव नाईक , ता.चिटनीस सुजाता देसाई , बुथ अध्यक्ष गुरू घाडी , नंदा गावडे , प्रकाश धुरी , आनंद धुरी , निवृत्त मुख्याध्यापक विष्णु रेडकर , आसोली हाय.मुख्याधिपीका सौ.भावना धुरी , सरस्वती विद्यालय टाक मुख्याध्यापक एस.एल.जाधव सर , शिरोडा हाय.मुख्याध्यापक एम.एन.कांबळी , रेडी हाय.मुख्याध्यापक चंद्रशेखर जाधव तसेच शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!