*कोकण Express*
*असलदे गावातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…*
*खा.विनायक राऊत यांच्या उपस्थतीमध्ये झाला प्रवेश..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
असलदे गावातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.यावेळी अक्षत खांडेकर ल,अजय घाडी, विनय परब,मयूर जंगले, महेश खरात यांच्यासह युवकांनी खा.विनायक राऊत यांच्या उपस्थतीमध्ये प्रवेश केला.
यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे,प्रदीप हरमलकर,लक्ष्मण लोके, संजय डगरे, विजय डामरे ,दिलीप डामरे, सिताराम डगरे, अनिल नरे, सुरेश मेस्त्री ,आत्माराम घाडी, आनंद तांबे, विजय परब व गावातील शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा.विनायक राऊत यांना गावातील विकासकामे याबाबत चर्चा करत निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच व उपसरपंच विजयी उमेदवारांचे खा.राऊत यांनी कौतुक केले.

