धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार  : श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती

धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार  : श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती

*कोकण Express*

*धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार  : श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती*

*कासार्डे  ; संजय भोसले*

सिंधूदुर्ग/तळेरे, दि. 3: 

धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी जी मदत लागेल ती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. धनगर समाजाने एकसंघ व संघटित होऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केले. कराड नांदगाव येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नंदूरबार येथील तळोदा संस्थानचे श्रीमंत अमरजीत राजे जहागिरदार व बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजीराव वाटेगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती  म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, श्रीमंत मल्हाराव होळकर, यशवंतराव होळकर यांचा आदर्श घेऊन बहुजन समाजाने वाटचाल करणे आवश्यक आहे. बहुजन समाजातील गोरगरीब वंचित घटकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, वंचित घटकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, वंचितांना सामाजिक, राजकीय, आर्थिक व सर्व क्षेत्रात आणून त्यांना सर्वोत्तम मदत करणार, धनगर समाज हा प्रामाणिक असून त्यांच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन राजकीय नेते मंडळींनी त्यांना मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्याचे काम केले. म्हणून धनगर समाजाने एकसंघ होऊन व संघटित होऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय गट तट बाजूला ठेवून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची प्रलंबित आहे. ते आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या लढ्याला माझे सर्वतोपरी सहकार्य राहील आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या बाबतीमध्ये  काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ  पातळीवर एक अभ्यास कमिटी नेमून त्याच्यावर सखोल अभ्यास करून धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार

आजही धनगर समाज मूलभूत गरजांपासून वंचित राहिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, वीज, शाळा, आरोग्य या सुविधा डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर समाज बांधवांपर्यंत पोहोचल्या नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा कालखंड गेला, तरीसुद्धा या महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित घटक विकासापासून वंचित राहिला त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  स्वराज संघटना निर्माण केली आणि पुन्हा एकदा नव्याने स्वराज्य निर्माण करून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती  यांनी केले.

प्रवीण काकडे यांचे मोठे योगदान (चौकट)
यावेळी बोलताना श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती  म्हणाले की, प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठे योगदान असून आपली नोकरी सांभाळून समाजात ग्राउंड लेव्हलला जाऊन डोंगरदऱ्याखोऱ्यातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद असून कोरोनाच्या काळातील अलौकिक असं काम केले आणि म्हणूनच आम्ही स्थापन केलेल्या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमध्ये आदराचे स्थान म्हणून त्यांना आमच्या स्वराज्य संघटनेमध्ये राज्याच्या कार्यकारणी मध्ये समावेश करत आहे.

याप्रसंगी श्रीमंत अमरजीत राजे जागीरदार, शिवाजीराव वाटेगावकर, प्रवीण काकडे, भगवानराव येडगे, बाळासाहेब खरात, संजय पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक महावीर काळे यांनी तर सूत्रसंचालन तेजस्विनी हुलवान व आकाश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!