कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सारेगमप फेम गायकांसोबत हास्यजत्रेचे कलाकार येणार

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सारेगमप फेम गायकांसोबत हास्यजत्रेचे कलाकार येणार

*कोकण Express*

*कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सारेगमप फेम गायकांसोबत हास्यजत्रेचे कलाकार येणार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायत च्या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी मोठ – मोठे टीव्ही कलाकार कणकवलीत दाखल होत असून, पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटना दिवशी 5 जानेवारी रोजी उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर 7.30 वा. टीव्ही कलाकारांचा धमाल कॉमेडी शो व बेधुंद गाण्यांच्या संगीत रजनी चा कार्यक्रम पर्यटन महोत्सवाच्या ठिकाणी होणार आहे. सेलिब्रेटी, सिंगर, सा रे ग म फेम मधील कलाकार सावनी रवींद्र,

कविता राम, विश्वजीत बोरवणकर, महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शामसुंदर राजपूत, चेतना भट, सूत्रसंचालक ऐश्वर्या पवार हे प्रसिद्ध असलेले कलाकार कणकवली वासियांना याची देही याची डोळा पाहता व लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवता ही येणार आहेत. टीव्ही कलाकारांसोबतच लाईव्ह कॉमेडी शो व

बेधुंद गाण्यांचा आस्वाद कणकवली वासियांना घेता येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. पाच ते आठ जानेवारी पर्यंत हा पर्यटन महोत्सव चालणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!