*कोकण Express*
*चिंचवली ग्रा. पं. सरपंच पदी अशोक भिकाजी पाटील विजयी*
*कणकवली प्रतिनिधी*
चिंचवली ग्रा. पं. मध्ये सरपंच पदाचे अपक्ष उमेदवार अशोक भिकाजी पाटील १६६ मतं मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपा चे अधिकृत उमेदवार श्रीकृष्ण भालेकर यांचा 23 मतांनी पराभव केला आहे. कणकवली तालुक्यात हा पहिला निकाल लागला आहे. पाटील यांचा विजय होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
