*कोकण Express*
*बाळासाहेबांची शिवसेना गावागावातील अस्तित्व दाखवून देणार*
*निवडणूक पक्ष निरीक्षक सुनील पारकर यांची मालवण येथे माहिती*
*मालवण ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले आहेत. या दृष्टीने मालवण तालुक्यातील गावागावातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या भागातील दोन्ही पक्षाच्या ताकदीनुसार उमेदवार ठरविले जातील. प्रत्येक गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद आहे. ग्रा. प. निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गावागावातील अस्तित्व दाखवून देऊ, असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मालवण तालुका निरीक्षक सुनील पारकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर राणे, कणकवली समन्वयक व मालवण तालुका निरीक्षक सुनील पारकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, ऋत्विक सामंत, पराग खोत, आशिष नाबर, नीलम शिंदे, सोनाली पाटकर, लुड्डीन फर्नांडिस, भारती घारकर, नेहा तोडणकर, निकीता तोडणकर, कविता मोंडकर, स्वप्नाली माळकर, गोपाळ शेलटकर, राजा तोंडवळकर, शेखर तोडणकर, सागर घाडगे आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी सुनील पारकर, बबन शिंदे म्हणाले, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितल्या नुसार प्रथम दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून त्यानंतर चर्चेतून दोन्ही पक्षाकडून कोणाची उमेदवारी कायम ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येईल.
यावेळी शिवराज्य ब्रिगेड संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रमुख पदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती केल्याचे पत्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुनील पारकर यांनी किसन मांजरेकर यांना सुपूर्द केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मांजरेकर यांचे अभिनंदन केले.