*लाखो भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या डामरे गावातील श्री गांगो अनभवानीचा उद्या जत्रोत्सव*

*लाखो भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या डामरे गावातील श्री गांगो अनभवानीचा उद्या जत्रोत्सव*

*कोकण Express*

*लाखो भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या डामरे गावातील श्री गांगो अनभवानीचा उद्या जत्रोत्सव*

*कणकवली ः प्रतिनिधी*

लाखो भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या कणकवली तालुक्यातील डामरे गावाची ग्रामदेवता श्री देव गांगो अनभवानी देवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी देव दिवाळी दिवशी होणार आहे. या जत्रा उत्सवात सिंधुदुर्ग सह विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. जत्रोत्सवात रात्री अकरा वाजता मंदिरासमोरील दीपमाळेवर कोहळ्यामध्ये पाच शेर पाण्यामध्ये दिवा पेटवण्याचा सोहळा हा भाविकांसाठी पर्वणीच असते. सकाळी नऊ वाजल्यापासून देवीची ओटी भरणे नवस भरणे फेडणे साड्या मानवणे असा कार्यक्रम असतो.रात्री अकरा वाजता मानकरी दीपस्तंबावर कोहळ्यातील दीप पेटवतात. त्यानंतर रात्री बारा वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात या जत्रा उत्सवात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डांबरे ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!