खरेदी विक्री संघ निवडणुकीत बाळासाहेबांचे शिवसेना सर्व 15 जागांवर निवडणूक लढवणार

खरेदी विक्री संघ निवडणुकीत बाळासाहेबांचे शिवसेना सर्व 15 जागांवर निवडणूक लढवणार

*कोकण Express*

*खरेदी विक्री संघ निवडणुकीत बाळासाहेबांचे शिवसेना सर्व 15 जागांवर निवडणूक लढवणार*

*आगामी सर्व निवडणुकीत बाळासाहेबांचे शिवसेना उतरणार निवडणूक रिंगणात ; संजय आग्रे*

*कणकवली तालुका खरेदीविक्री संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन केले दाखल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक मैदानात उतरली असून कणकवली तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी आज व्यक्तीगत सदस्य गटातून प्रवीण अनंत पारकर यांचे नामनिर्देशन सहाय्यक उपनिबंधक यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले. सूचक भूषण परुळेकर यांनी नामनिर्देशन दाखल केले. यावेळी माजी जि प सदस्य संजय आग्रे, संदेश पटेल, भूषण परुळेकर, शेखर राणे, सुनील पारकर, राजन नानचे, सुभाष जाधव, बाबू आचरेकर आदी उपस्थित होते. सर्वच्या सर्व 15 जागांवर आपले उमेदवार खरेदी विक्री संघ निवडणुकीत उतरवणार असल्याचे माजी जि प सदस्य संजय आग्रे यांनी प्रवीण पारकर यांचे नामनिर्देशन दाखल केल्यानंतर सांगितले . कणकवली खरेदीविक्री संघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणारा बाळासाहेबांची शिवसेना हा पहिला पक्ष ठरला आहे. पक्ष स्थापनेनंतर प्रथमच बाळासाहेबांची शिवसेना निवडणुकीत उतरली असून त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!