*कोकण Express*
*शिवडाव गावाला विकासाच्या नकाशावर प्रथम ठेवण्याचं काम आम्ही करू – आम. नितेश राणे*
*शिवडाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवडाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकास कामांचे आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. शिवडाव सार्वजनिक नळयोजना दुरुस्ती व विस्तारीकरण करणे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी 56 लाखांचा निधी या कामांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवडाव येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिवडाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा, शिवडाव सार्वजनिक नळयोजना दुरुस्ती व विस्तारीकरण करणे, शिवडाव हत्तीचे पाऊल ते राऊळवाडी रस्ता डांबरीकरण करणे, शिवडाव हत्तीचे पाऊल ते खालची गावकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, शिवडाव मुख्य रस्ता ते पटेल रस्ता डांबरीकरण करणे, शिवडाव गावातील मुख्य रस्त्यावरील पिक-अप शेड या कामांचे उद्घाटन यावेळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याआधी ज्या लोकांवर विश्वास टाकून आपण त्यांना निवडून दिले त्यांनी गावातील कोणती कामे पूर्ण केली? ज्यावेळेपासून आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी सत्तेच्या चाव्या आमच्या हाती दिल्या, त्यावेळेपासून आम्ही तुम्हाला दिलेले सारी आश्वासने पूर्ण करत आहोत. मतांच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद दिला तर आम्ही कोणत्याच बाबतीत गावाचा विकास करण्यात कमी पडणार नाही. शिवडाव गावाला विकासाच्या नकाशावर एक नंबरला ठेवण्याचं काम आम्ही करू, असे आश्वासन यावेळी आमदार नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिले. आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून शिवडाव गावातील विविध विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. सत्तेत आल्यावर तसेच गेल्या सात वर्षांमध्ये विरोधी पक्षात असतानाही त्यांनी शिवडाव गावातील विकास कामांकडे वेळोवेळी लक्ष दिले. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन काही विकास कामे थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातील रामेश्वर मंदिरकडचा बंधारा येणाऱ्या मे महिन्याच्या अगोदर त्या ठिकाणी हा बंधारा पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू करण्याचा शब्द आज नितेश राणे यांच्या माध्यमातून आपण देत असल्याचे माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांनी सांगितले. तसेच विकास कामांसाठी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणा असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, सोसायटी चेअरमन किरण गावकर, नितीन गावकर, विनोद गावकर, अमेय सावंत, अभि नाडकर्णी, सरपंच वनिता जाधव, व्हाईस चेअरमन स्नेहल पाताडे, रवी सावंत, कुलदीप जाधव, बाबू सावंत, भांडुप भाजप विधानसभा उपाध्यक्ष गणेश जाधव, चंदू शिरसाट तसेच इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

