राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये

राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये

*कोकण Express*

*राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय काँग्रेस कणकवली कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रविण वरुणकर, तालुकाध्यक्ष
प्रदीप मांजरेकर, राजु वर्णे, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालंडकर, नादीरशा पटेल, संतोष तेली, अमृता मालंडकर, रुपा चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येत्या निवडणुकीत कणकवली नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली फडकविण्याचा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अजय मोरये यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!