*कोकण Express*
*राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सुबुद्धी दे!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्येची देवता मानली जात असणाऱ्या सरस्वती देवी बद्दल अनुद्गार काढणाऱ्या व या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांना कणकवली भाजपच्या वतीने सरस्वती देवीचा फोटो सरस्वती पूजनाचे औचित्य साधून पोस्टाद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेले वक्तव्य हे देव देवतांचे अपमान करणारे असून या वक्तव्याचा कणकवली भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच सरस्वती देवीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सुबुद्धी देऊ दे असे साकडे देखील यावेळी घालण्यात आले. कणकवली पोस्टातून हा फोटो छगन भुजबळ यांना पाठवताना भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच पंढरी वायंगणकर शहराध्यक्ष आण्णा कोदे, नगरसेवक मेघा युवा मोर्चा सरचिटणीस सदीप मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सरपंच बापू फाटक,शशी राणे,प्रदीप गावडे,नितीन पाडावे,अभय गावकर,स्वप्निल चिंदरकर,समर्थ राणे,संदेश सावंत,सदानंद चव्हाण,विजय चिंदरकर,निखिल आचरेकर,प्रदीप गावडे,कमलेश पाटील,सूरज घाडीगांवकर,सुदर्शन राणे,संदेश आदी उपस्थित होते.
