*कोकण Express*
*राज्य कर्मचार्यांना मिळणार कोविडवरील खर्चाची प्रतिपूर्ती*
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड 19 आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.
शासकीयअधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसचं गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते.
