*कोकण Express*
*मुंबई – गोवा महामार्गावर नडगीवे येथे रुग्णवाहिका ,कंटेनर तसेच आयशर टेम्पो या तीन वाहनांचा अपघात*
याबाबत अधिक वृत्त असे की,मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण नडगिवे येथे खारेपाटण प्रा आ केंद्राची रुग्णवाहिका वाहन क्र. MH07 AJ2339 ही गाडी चालक श्री मारुती जोशी हे नडगिवे येथील गणेश कर्ले यांच्या सर्विसिंग सेंटर वर गाडी सर्विसिंग करण्यासाठी घेऊन आले होते याच दरम्यान गोवा वरून आलेला व मुंबईच्या दिशेने जाणारा अवजड कंटेनर वाहन क्र. GT15YY9604 चालक पिंटोसिंग यादव वय -३३ राहणार – मोहरत बिहार हा भरधाव वेगात घेऊन येत असताना समोर उभा असलेला आयशर टेम्पो वाहन क्र.MH04JK4324 याला घासत सर्विसिंग सेंटर मध्ये आत प्रवेश करणाऱ्या खारेपाटण प्रा आ केंद्राच्या रुग्णवाहिकेला सुद्धा जोरदार धडक दिल्यामुळे या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात खारेपाटण प्रा आ केंद्राच्या रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे.
दरम्यान अपघाताची माहिती समजताच नडगिवे गावचे सरपंच अमित माजरेकर,खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये,भाऊ राणे यानी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली. तर अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस श्री उद्धव साबळे,पराग मोहिते यांनी घटनास्थळी तातडीने भेट अपघाताची माहिती घेतली घटनेचा पंचनामा केला.
या अपघातात आयशर टेम्पो चालक उल्हास जानबा वय – ४१ हा मुबई गोवा महामार्गावर नडगिवे येथे गणेश कर्ले येथे चहा साठी थाबला असता त्याच्या गाडीला सुद्धा सदर कंटेनर ने धडक दिल्यामुळे गाडीच्या समोरच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
खारेपाटण प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलकंठ घोपे,डॉ.प्रिया वडाम यांनी देखील घटनस्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली. दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रिय महामार्गावर नडगिवे येथे अवघड वळणावर काम ठप्प असलेल्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन अपूर्ण रस्ता पूर्ण करणे आवश्यक आहे. या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

