*कोकण Express*
*नांदगाव येथील रोहन नलावडे महामार्ग प्राधिकरणविरोधात साखळी उपोषण*
नांदगाव येथील रोहन नलावडे व कुटुंबियांच्या वतीने हायवे प्राधिकरण, ठेकेदार,भूमीअभिलेख व प्रातांधिकारी याच्या मनमानी कारभारामुळे अनधिकृत माती उत्खनन, वृक्षतोड, भूसंपादन व विदयुत खांबाची धोकादायक रचनेमुळे त्याच्या घराचे नुकसान होत असल्याने बुधवारी सकाळी सुरु झालेले साखळी उपोषण गुरुवारी दुस-या दिवशीही सुरुच होते. मात्र येवढे होवूनही ठेकेदार कंपनी अरेरावीची भाषा करत आहेत तर प्रशासनाला जाग येत नसल्याने हे उपोषण न्याय मिळत नाही तो पर्यंत सुरुच राहणार असल्याचे नलावडे याच्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान उपोषण स्थळी दुस-या दिवशीही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी व नागरीकांनी भेट दिली. मात्र बुधवारी हायवे प्राधिकरण उपविभाग खारेपाटण याच्या अधिका-यांनी भेट दिली मात्र ठोस निर्णय न दिल्याने आज शुक्रवारी दुस-या दिवशीही साखळी उपोषण सुरूच होते. आजही भूमीअभिलेख, प्रतांधिकारी अधिकारी यांच्यासह कोणही घटनास्थळी दाखल न होता दखल घेत नसल्याने सर्वांनीच नाराजी व्यक्त करत नलावडे कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे दुस-या दिवशीही हे साखळी उपोषण सुरुच होते.
