कवी अजय कांडर यांच्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या दीर्घ कवितासंग्रहाचे २ ऑक्टोंबर रोजी पुणे येथे प्रकाशन

कवी अजय कांडर यांच्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या दीर्घ कवितासंग्रहाचे २ ऑक्टोंबर रोजी पुणे येथे प्रकाशन

*कोकण Express*

*कवी अजय कांडर यांच्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या दीर्घ कवितासंग्रहाचे २ ऑक्टोंबर रोजी पुणे येथे प्रकाशन*

*समीक्षक प्रा.नीतीन रिंढे, रंगकर्मी अतुल पेठे यांच्या हस्ते प्रकाशन*

*पुणे राष्ट्र सेवा दल आणि हर्मिस प्रकाशनाचे आयोजन*

*कणकवली/प्रतिनिधी*

कवी अजय कांडर लिखित “अजूनही जिवंत आहे गांधी” या हर्मिस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिवशी स. ११ वा. राष्ट्र सेवा दल सभागृह पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्र सेवा दल पुणे आणि हर्मिस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नामवंत समीक्षक तथा मराठी भाषा संशोधन मंडळ नवनियुक्त संचालक प्रा डॉ नीतीन रिंढे यांच्या हस्ते “अजूनही जिवंत आहे गांधी” या संग्रहाचे प्रकाशन होणार असून यावेळी विचारशील रंगकर्मी अतुल पेठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कवी अजय कांडर यांची यापूर्वी ‘हत्ती इलो’ ही दीर्घ राजकीय कविता बहुचर्चित झाली आहे. त्यानंतर “युगानुयुगे तूच” ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर लिहिलेली कविता अमाप लोकप्रिय झाली.अहिंसा आणि शांती याचा मार्ग जगाला दाखविणाऱ्या गांधीजींच्या विचाराची सर्वाधिक गरज आजच्या काळात असताना त्यांची “अजूनही जिवंत आहे गांधी” ही दीर्घ आता कविता प्रसिद्ध होत आहे.
भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांची दीर्घ प्रस्तावना सदर संग्रहाला लाभली आहे. त्यात ते म्हणातात, मराठीतील नामवंत कवी अजय कांडर यांना ही महात्मायिका लिहायची प्रेरणा
झालीय,हे कालोचितच आहे.
इतिहासाची पाने फाडली तरी गांधी विचार फाडता येत नाही. एकदा महात्म्यावर तीन गोळ्या झाडून त्याला मारलं होतं, पण अजूनही जिवंत आहे गांधी! गर्दीत राहणं सोपं असतं, पण एकांडा शिलेदार गर्दीची पर्वा करत नाही. सत्य माहीत असताना ते न सांगता राहणं हा भित्रेपणाच नव्हे तर गुन्हा आहे. सत्याधिष्ठित मत मांडायला हिंमत जरूर लागते. ही हिंमत आपल्या इमानाशी एकनिष्ठ असणाऱ्यांकडे असते. अजय कांडर ह्यांच्या निष्ठेला व जिद्दीला आमचा सलाम.तरी या प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक पुणे राष्ट्र सेवा दल आणि हर्मिस प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!