महाराष्ट्र सरकारचा पर्यटन मित्र 2022 पुरस्कार पर्यटन व्यावसायिक महासंघास प्राप्त

महाराष्ट्र सरकारचा पर्यटन मित्र 2022 पुरस्कार पर्यटन व्यावसायिक महासंघास प्राप्त

*कोकण Express*

*महाराष्ट्र सरकारचा पर्यटन मित्र 2022 पुरस्कार पर्यटन व्यावसायिक महासंघास प्राप्त*

*विष्णू मोंडकर अध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक महासंघ*

पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणातील पर्यटन वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित असून बीच टुरिझम बरोबरच हिस्ट्री ,कल्चर ,मेडिकल,हेरिटेज,फूड टुरिझम च्या माध्यमातून कोकणामध्ये बारमाही पर्यटन चालू होऊ शकते तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कार्य करत आहे .दोन वर्षाच्या कोरोना नंतर पर्यटन व्यवसाय पूर्व पदावर येताना व्यावसायिकांना आवश्यक असलेली ट्रेनींग आर्थिक उभारणीसाठी महासंघातर्फे प्रयत्न केले जात असून या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारचा पर्यटन संचालनालय मार्फत दिला जाणारा पर्यटन मित्र पुरस्कार जागतिक पर्यटन दिनी वेंगुर्ला येथे झालेल्या पर्यटन चर्चासत्र कार्यक्रमात मा.आमदार व मा.उपाध्यक्ष पर्यटन संचालनालय श्री प्रमोदजी जठार ,श्री संजयजी ढेकणे वरिष्ठ प्रादेशिक पर्यटन अधिकारी कोकण,श्री प्रशांत वाणी पर्यटन संचालनालय कर्नल श्री.सुधीर सावंत मा.आमदार राजनजी तेली यांच्या उपस्थित देण्यात आला.यावेळी महासंघ अध्यक्ष यांनी यावर बोलताना सांगितले की महासंघाच्या कोकण क्षेत्रात चालू असलेल्या कार्याची दखल राज्य सरकारने घेतली त्याबद्दल महासंघ राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो व येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकां भेडसविणारे प्रश्न प्रामुख्याने सरकार ने मार्गी लावावे हीच अपेक्षा आहे ही भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!