*कोकण Express*
*२६/११* च्या हल्ल्यात शहीद झालेल्या कै.विजय साळसकर यांचा कोकणातील वैभववाडी येथील स्मारक सोलर लाईटने झगमगला*
*मनसे लॉटरी सेना विक्रेता अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम*
मुबंईवर झालेल्या *२६/११ चा हल्ला* आपण कोणीही विसरू शकत नाही.या हल्ल्यात पोलीस अधिकारी *कै. #विजय साळसकर साहेब शहीद झाले*. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकणात *वैभववाडी* येथे स्मारक बांधण्यात आले. मी पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने गावी जाणे येणे असतेच. मुबंई गोवा हायवे चे काम सुरू असल्याने मी नेहमी मुबंई पुणे कोल्हापूर येथून गगनबावडा घाटातुन वैभववाडी वरून माझ्या ओसरगावी जातो. *वैभववाडी येथे येडगाव हे शहीद कै. विजय साळसकर साहेबांचे मूळगाव* व येथेच रस्त्यालगत हे स्मारक आहे. पण जेव्हा मी गावी जातो तेव्हा हे स्मारक रात्रीच्या वेळी अंधारात असते. तेव्हा या स्मारकाला *सोलर लाईट लावण्याचा* विचार माझ्या मनात आला. ही बाब मी माझे वैभववाडीचे मित्र *चंद्रशेखर सावंत* यांना सांगितली. त्यांनी लगेच होकार देऊन मुंबईहुन माझ्या जवळून सोलर लाईट घेऊन त्या स्मारकाच्या ठिकाणी लावल्या देखील. अशा प्रकारे देशासाठी शहीद झालेल्या या कोकणच्या सुपुत्राच्या स्मारकासाठी मानवंदना देण्याचे भाग्य लाभलं