*कोकण Express*
*पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देणाऱ्या ‘त्या’ नतभ्रष्ट युवकांवर देशविरोधी कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा…*
*मनसेची सावंतवाडी पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर निदर्शने करून निवेदन सादर*
पुण्यात पीएफआय संघटनेच्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या त्या युवकांवर देशविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज मनसेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडी पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर “वंदे मातरम,भारत माता की जय,देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,पाकिस्तान मुर्दाबाद” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.देशविरोधी घोषणा देणारी बांडगूळ वेळीच ठेचायला हवी अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार,कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,परिवहन जिल्हाध्यक्षपदी राजू कासकर, कुणाल किनळेकर,बाबल गावडे,दिपक गावडे,संतोष भैरवकर,आबा चिपकर,कौस्तुभ नाईक आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.