*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड : सुगंधा घाडी हिचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार*
देवगड तालुक्यातील हिंदळे गावची सुकन्या सुगंधा घाडी हिची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल तिच्या घरी जाऊन सिंधुदुर्ग जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला यावेळी देवगड युवक काँग्रेसचे आदित्य आचरेकर किरण हळदणकर रुपेश राणे किंजवडे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद परब अविनाश राणे दर्पण राणे दिनकर राणे सुहास राणे संकेत घाडी जयदीप घाडी अन्य युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते ती क्रिकेट संघात गोलंदाज म्हणून भूमिका बजावत आहे तिला पुढील वाटचालीसाठी कॉंग्रेसच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तिने आपल्या कार्याची सर्वात प्रथम दखल घेतल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा युवक कॉंग्रेस चे आभार मानले.

