*कोकण Express*
*भाजपा नेते खा.नारायण राणे यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंञी प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट*
गोवा राज्याचे मुख्यमंञी ना. प्रमोद सावंत यांची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी भाजपा खासदार नारायण राणे यांनी पणजी येथे सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. गोवा राज्याचे मुख्यमंञी ना. प्रमोद सावंत यांची त्यांच्या पणजी येथील महालक्ष्मी या मुख्यमंञी निवासस्थानी खा.नारायण राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. गोवा राज्याचे मुख्यमंञी ना. प्रमोद सावंत यांनी खा. नारायण राणे यांना लामणदिवा भेट दिला. मुख्यमंञी ना. प्रमोद सावंत व खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट होती असे सांगण्यात आले.
