खाजगी बस चालकांची मुजोरी सहन करू नका,ऐकत नसतील तर थेट गुन्हे दाखल करा

खाजगी बस चालकांची मुजोरी सहन करू नका,ऐकत नसतील तर थेट गुन्हे दाखल करा

*कोकण Express*

*खाजगी बस चालकांची मुजोरी सहन करू नका,ऐकत नसतील तर थेट गुन्हे दाखल करा…*

*नंदकिशोर काळे:चाकरमान्यांची गैरसोय होऊ देऊ नका अन्यथा याचे परीणाम भोगावे लागतील*

*सिंधुदुर्गनगरी*

चतुर्थीच्या काळात येणा-या चाकरमान्यांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. त्यामुळे खाजगी बस चालकांची मुजोरी सहन करू नका. ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा, अशा सूचना सिंधुदुर्गाचे परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी आज सावंतवाडी कुडाळ व बांदा पोलीस निरीक्षकांना दिल्या आहेत. याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल आक्रमक भूमिका घेत अरेरावी करणाऱ्या बसचालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली आज परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी काही झाले तरी चाकरमान्यांची गैरसोय होऊ देऊ नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा काँग्रेसकडून आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, बबन डिसोझा, बबलू डिसोझा, आनंद कुंभार, किशोर रावराणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!