शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे दुरुस्त करा

शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे दुरुस्त करा

*कोकण Express*

*शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे दुरुस्त करा..*

*सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी…*

*सावंतवाडी ःःप्रतिनिधी* 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता सावंतवाडी शहरातील नादुरुस्त झालेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात यावे असे मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.
श्री मसुरकर यांनी या संदर्भातील निवेदन प्रसिद्ध दिले आहे त्यात असे म्हटले की सावंतवाडी शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे सदस्य सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी ठेकेदार नेमलेला आहे सद्यस्थितीत शहरातील काही भागातील हे कॅमेरे बंद असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला तत्काळ सूचना देण्यात याव्यात जिल्ह्यात तसेच सावंतवाडी तालुक्यांमध्ये चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त झाल्यास त्याचा फायदा चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ही होऊ शकतो याबाबत गांभीर्याने घेऊन सदर कॅमेरे दुरुस्तीबाबत तात्काळ सूचना देण्यात यावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!