युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष निलेश तेली यांचा शिंदे गटात प्रवेश

युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष निलेश तेली यांचा शिंदे गटात प्रवेश

*कोकण Express*

*युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष निलेश तेली यांचा शिंदे गटात प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

युवक काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष निलेश तेली यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर राणे यांनी त्यांचे शिंदे गटात स्वागत केले. या प्रवेशाप्रसंगी माजी नगरसेवक भूषण परुळेकर, अनिल खोचरे, बाबू आचरेकर, सुनील हरमळकर, चिन्मय राणे, दीपक राऊत आदि उपस्थित होते. कालच माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा आज हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश केल्याने एक प्रकारे हा काँग्रेसला धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!