*कोकण Express*
*युवासेना नाटळ शाखाप्रमुख पदी गौरव सावंत, दिगवळे शाखाप्रमुख पदी उमेश गावडे!*
*तर दारीस्ते उपशाखाप्रमुख पदी अमित सावंत यांची नियुक्ती!*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केल्या नियुक्त्या!*
*कणकवल. ःःप्रतिनिधी*
नाटळ विभागातील युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांच्या गावनिहाय बैठका जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ सतिश सावंत यांच्या करण्यात आला. तसेच युवासेना रिक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या.
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या!
युवासेना नाटळ शाखाप्रमुख पदी गौरव सावंत, दिगवळे शाखाप्रमुख पदी उमेश गावडे, दारीस्ते उपशाखाप्रमुख पदी अमित सावंत यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत, विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवासेना तालुका समन्वयक गुरुनाथ पेडणेकर, तेजस राणे, युवासेना उपतालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना विभागप्रमुख संतोष सावंत.
कुंभवडे येथे सरपंच आप्पा तावडे, शाखाप्रमुख प्रकाश बिले, युवासेना शाखाप्रमुख चेतन गुरव, प्रदिप सावंत, पांडुरंग सावंत, प्रदिप सुतार, पंढरी सदडेकर, सुरेश सावंत, संदिप सावंत, विजय कानडे, उमेश सुतार, सुमित सावंत,
नाटळ येथे प्रदीप सावंत, सचिन सावंत, गणेश सावंत, रमाकांत गावकर, अभिषण सावंत, युवासेना शाखाप्रमुख गौरव सावंत,
दिगवळे येथे शिवसेना उपविभागप्रमुख श्यामसुंदर परब, शाखाप्रमुख रुपेश गावकर, संजय आचरेकर, माजी सरपंच दिपक मेस्त्री, उमेश गावडे, दिपक मठकर, सुरेश गावडे, गुरुनाथ नेवाळकर, धोंडी गावडे,
दारीस्ते येथे लवू पवार, बंड्या सावंत, रामचंद्र गुरव, विनायक गुरव, दिपक मेस्त्री, निलेश तेली, सुधाकर जाधव, प्रविण जाधव, युवासेना उपशाखाप्रमुख अमित सावंत आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

