*कोकण Express*
*माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत शिंदे गटात*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या उपस्थितीत केला प्रवेश; ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या पक्षप्रवेशाने सिंधुदुर्गात शिंदे गटाला मिळणार बळ*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
सिंधुदुर्ग – राजापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार रविंद्र फाटक, आ. संजय शिरसाट, आ. बालाजी कल्याणकर, आ. महेंद्र थोरवे उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्गातून शिंदे गटाचे शिलेदार असलेले सुनील पारकर, बाळू पारकर, शैलेश सावंत, ए. पी.सावंत, राजू नार्वेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांची संघटना असून 1 लाखहुन अधिक माजी सैनिक या संघटनेचे सदस्य आहेत. हे सर्व माजी सैनिक शिंदे गटात सामील होतील. तसेच सिंधुदुर्गातही शिवसेना शिंदे गटाला बळकटी देण्यासाठी माझ्या संपर्कातील कार्यकर्ते कामाला लागतील असे सावंत म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवणे याला प्राधान्यक्रम असेल असे सांगत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक सुविधा पुरविणार असल्याचे सांगितले.