सत्यवान रेडकर यांचे निशुल्क स्पर्धा परिक्षेंचे मार्गदर्शन—गरजूनी लाभ घ्यावा

सत्यवान रेडकर यांचे निशुल्क स्पर्धा परिक्षेंचे मार्गदर्शन—गरजूनी लाभ घ्यावा

*कोकण Express*

*सत्यवान रेडकर यांचे निशुल्क स्पर्धा परिक्षेंचे मार्गदर्शन—गरजूनी लाभ घ्यावा*

*कासार्डे:संजय भोसले*

सिंधुदुर्गचे सुपुत्र, प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे ५-७ सप्टेंबर २०२२ रोजी सावंतवाडी तसेच कुडाळ तालुक्यात नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानांचे आयोजन
संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात निशुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यानाचे शतक पूर्ण करणारे, सात शैक्षणिक अर्हता असणारे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सावंतवाडी तालुक्यातील मु.पो.कवठणी (बोरभाटवाडी) या गावचे सुपुत्र श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांचे खालील वेळापत्रकाप्रमाणे सावंतवाडी तसेच कुडाळ तालुक्यात, नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (COMPETITIVE EXAM CAREER GUIDANCE) आयोजित केली गेली आहेत.

*सोमवार ५ सप्टेंबर २०२२*
*सकाळी १०.०० वाजता*
पूर्ण प्राथमिक शाळा निरुखे नं. १, तालुका कुडाळ

*मंगळवार ६ सप्टेंबर २०२२*
*सकाळी ८.३० वाजता,*
मिलाग्रिस हायस्कूल, सलाईवाडा, सावंतवाडी

*सकाळी ११.०० वाजता,*
परुळेकर हॉल, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी

*बुधवार ७ सप्टेंबर २०२२*
*सकाळी ९.३० वाजता*
श्री सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स तळवडे , सावंतवाडी

*दुपारी २.०० वाजता*
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, प्लाॅट नं ०४, कुडाळ एमआयडीसी
याठिकाणी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!