सरंबळ गावचे माजी उपसरपंच श्री.सत्यविजय कदम यांचे मुंबई येथे झाले निधन

सरंबळ गावचे माजी उपसरपंच श्री.सत्यविजय कदम यांचे मुंबई येथे झाले निधन

*कोकण Express*

*सरंबळ गावचे माजी उपसरपंच श्री.सत्यविजय कदम यांचे मुंबई येथे झाले निधन*

*कुडाळ | प्रतिनिधी*

 सरंबळ गावचे माजी उपसरपंच श्री.सत्यविजय कदम वय 47 यांचे आज सकाळी मुंबई येथे केम रुग्णालयात अल्पशा आजारावर उपचार चालू असताना आकस्मिक निधन झाले आहे. आठ दिवसांपूर्वीच त्यांना मुंबई येथे नेऊन ऍडमिट करण्यात आले होते. सरंबळ गावच्या सरपंच पदाचा कार्यभार देखील त्यांनी काही कालावधी पाहिलेला आहे. सदैव हसमुख व गावच्या विकासासाठी नेहमी झटणारा म्हणून त्याची गावात ओळख होती. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणे गावातील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सहभाग असायचा, ते उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. त्याच्या अचानक निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. सत्यविजय यांचे पश्चात त्यांचे दोन भाऊ व बहिणी असा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!