अनियमित वीजपुरवठ्या बाबत भाजपा विज अधिकारयांना जाब विचारणार

अनियमित वीजपुरवठ्या बाबत भाजपा विज अधिकारयांना जाब विचारणार

*कोकण Express*

*अनियमित वीजपुरवठ्या बाबत भाजपा विज अधिकारयांना जाब विचारणार*

*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस , भाजपा सिंधुदुर्ग*

वेंगुर्ले शहराबरोबर तालुक्यामध्ये काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो . याबाबत विज अधिकारयांना जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ = ०० वाजता भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विज वितरण कार्यालयावर धडक देणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .
सद्ध्या सणासुदीचा काळ सुरू असुन , येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार आहे . परंतु सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गणेशोत्सवापुर्वी करण्यात येणारया कामांचा खेळखंडोबा होत आहे .त्याचप्रमाणे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गृहीणी तसेच व्यापारी वर्गाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने गणेश मुर्तीकारांच्या कामावर परीणाम होत आहे . गणेश चतुर्थी एक आठवड्यावर आल्यामुळे मुर्तीकारांची लगबग सुरू आहे , परंतु सातत्याने विज प्रवाह खंडित होत असल्यामुळे मुर्तीकारांना काम करणे कठीण बनले आहे .
तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे तसेच अति उच्च दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गेल्या महीन्या भरात अनेकांचे इन्हर्टर , पंखे तसेच दुरदर्शन संच जळाल्याच्या घटना घडल्या आहेत .
याबाबत विज वितरण विभागास जाब विचारण्यासाठी भाजपा वेंगुर्ले चे कार्यकर्ते , सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ = ०० वाजता अधिकारयांना भेटणार आहेत , तरी समस्त वेंगुर्ले वासीयांनी यावेळी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!