शिवसेना नेत्यांचा उद्या वैभववाडी दौरा

शिवसेना नेत्यांचा उद्या वैभववाडी दौरा

*कोकण Express*

*शिवसेना नेत्यांचा उद्या वैभववाडी दौरा*

*भुईबावडा, कोकिसरे, लोरे जि.प. विभागात बैठकांचे आयोजन*

शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील जिल्हापरिषद मतदारसंघामध्ये विभागीय बैठका उद्या शनिवार दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. दुपारी ३ वा. भुईबावडा जि. प. विभागाची बैठक रमाकांत मोरे ( गावठाण) यांच्या घरी होणार आहे. सायंकाळी ५ वा. कोकिसरे जि. प. विभागाची बैठक वैभववाडी आंबेडकर भवन येथे होणार आहे. तर सायंकाळी ७ वा. लोरे जि.प. विभागाची बैठक मांजलकरवाडी येथील विलास नावळे यांच्या घरी होणार आहे.
या बैठकीला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना युवानेते संदेश पारकर,अतुल रावराणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे आदी शिवसेना नेत्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी बैठकांना त्या त्या विभागातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, व युवासेना तालुकाप्रमुख अतुल सरवटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!