*कोकण Express*
*मळगांवचे माजी उपसरपंच मोतीराम राऊळ यांचे निधन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळगांवचे माजी उपसरपंच तथा माळीचे घर येथील घरवडकर कुटुंबाचे जेष्ठ सदस्य मोतीराम आत्माराम राऊळ (८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राहत्या घरी रविवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. मोतीराम भाऊ म्हणून ते परिचित होते.
मळगांव ग्रामपंचायतचे सदस्य, उपसरपंच व गावचे पोलीस पाटील म्हणूनही त्यांनी काम केले होते. सत्तरच्या दशकात एक उत्कृष्ट विहिर बांधकाम कारागीर तसेच उत्कृष्ट गवंडी म्हणून ते परिचित होते. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा वावर होता. वारकरी संप्रदायात असलेल्या भाऊंना गावात मोठा मान होता. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहीत मुलगी, सूना, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे.