*कोकण Express*
*युवा उद्योजक दिवेश पाटील यांच्याकडून करुळ गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*वैभववाडी l प्रतिनिधी*
युवा उद्योजक दिवेश पाटील यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त करूळ येथील माध्यमिक व प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
माध्यमिक विद्यालय करूळ, विद्यामंदिर गावठण अ, विद्यामंदिर गावठण ब, जामदारवाडी, भट्टीवाडी, भोयडेवाडी, खडकवाडी आदी शाळातील विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी संदीप सरवणकर, सरपंच सरिता कदम, माजी सरपंच हिंदुराव पाटील, सह्याद्री जीवरक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रवींद्र पवार व शाळातील मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. जिद्द, परिश्रम व चिकाटी याच्या जोरावर चांगले अधिकारी बनले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली पाहिजे. व आपल्या गावचे, जिल्ह्याचे नाव उज्वल केले पाहिजे असे बोलताना दिगंबर पाटील यांनी सांगितले.

