*कोकण Express*
*कणकवली निवासी नायब तहसीलदारपदी सुजाता पाटील…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील निवासी नायब तहसीलदारपदी सुजाता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती पाटील यांनी आज पदभार स्वीकारला.
सुजाता पाटील यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार रोजगार हमी योजना, तसेच सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार म्हणूनही यशस्वीरित्या पदभार सांभाळला होता. येथील तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून थेट पदभार स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला नायब तहसीलदार असल्याचे सांगण्यात आले.