*कोकण Express*
*गणेशोत्सवासाठी गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून नागपूर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय*
*वर्धा-आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर कोकणातील प्रवाशांना विदर्भात व विदर्भातील प्रवाशांना कोकणात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून ०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस व्दि साप्ताहिक चालवण्याचा निर्णय*
२४ ऑगस्ट रोजी या गाड्या सोडण्यात येणार असून वर्धा थांबा देण्यात आल्याने वर्धा ते सावंतवाडी रोड जाण्यासाठी रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे ०११३९ ही गाडी नागपूर येथुन दु ०३.०५ वा सुटणार आहे दुसर्या दिवशी मडगाव येथे सं ०५.३० वा पोचणार आहे तर परतीच्या प्रवासाकरीता मडगाव येथुन सं ७.०० वा सुटणार आहे दुसर्या दिवशी नागपूर येथे रा.०९.३० वा पोचणार आहे या रेल्वेसेवेला नागपूर,वर्धा जं,पुलगाव,धामणगाव,बडनेरा,अकोला जं,मलकापूर,भुसावळ जं,नाशिक रोड,ईगतपुरी,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,वीर,खेड,चिपळूण,सावर्डा,आरवली रोड,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,अडवली,विलवडे,राजापुर रोड,वैभववाडी रोड,नांदगाव रोड,कणकवली,कणकवली,सिंधुदुर्ग नगरी,कुडाळ,सावंतवाडी रोड,थिविम,करमाळी,मडगाव स्थानकावर थांबे देण्यात आलेले आहेत
सदर ०११३९/०११४० नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक सुपरफास्ट प्रतिक्षा एक्स्प्रेस स्पेशलला द्वितीय वातानुकूलित,तृतीय वातानुकूलित,शयनयान आरक्षित चालवण्यात येणार आहे ही रेल्वेसेवा नागपूर येथुन दर बुधवार,शनिवार २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर व मडगाव येथुन गुरूवार,रविवार २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर मध्य,कोकण रेल्वेकडून चालवण्यात येणार आहे या रेल्वेसेवेला कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री वैभव मनोज बहुतूले यांनी प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,केंद्रीय रस्ते,सडक,वाहतूक, महामार्ग,राजमार्ग,दळणवळण,परिवहनमंत्री व नागपूर खासदार नितीन गडकरी,भंडारा खासदार सुनिल मेंढे,वर्धा खासदार रामदास तडस,अमरावती खासदार सौ नवनीत राणा,अकोला खासदार संजय धोत्रे,बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव,जळगाव खासदार सौ रक्षा खडसे,उन्मेष पाटील,नाशिक खासदार हेमंत गोडसे,सौ भारती पवार यांच्याकडे ०१२५५/०१२५६ नागपूर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस रेल्वेसेवेला कायमस्वरूपी सुरू ठेवावी व पेण,मनमाड,चाळीसगाव,पाचोरा,मुक्ताईनगर,नांदुरा,शेगांव,मुर्तीजापुर,अमरावती थांबे देण्यात यावे अशी वारंवार पत्राद्वारे केली जात आहे
०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट स्पेशल रेल्वेसेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण ते सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना मुंबई अध्यक्ष यशवंत परब,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय महिला रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्षा शबनम शेख,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगांवकर,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी यांनी केले आहे सदर रेल्वेसेवेचे
संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले अधिक माहितीकरीता indianrail.gov.in,irctc.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेे

